Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Vajan Ghatvaa वजन घटवा
Vajan Ghatvaa वजन घटवा
Vajan Ghatvaa वजन घटवा
Ebook223 pages1 hour

Vajan Ghatvaa वजन घटवा

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

Loose your weight the ayurvedic way
Loose your weight according to Ayurvedic methods, Daily Diet, Simple Methods, Some Exercise
वाढतं वजन ही प्रत्येकालाच काळजी वाटणारी बाब असते. वाढणारं वजन कसं कमी करायचं. याबद्दलचं मार्गदर्शन या पुस्तकात आहे. रोजच्या आहारात कसे बदल करायचे, जेवणाच्या वेळा का पाळायच्या आणि वजन वाढणार नाही, यासाठी नेमका कसा आहार घ्यायचा याच्या टिप्स वैद्य सुयोग दांडेकर यांनी दिल्या आहेत.

Languageमराठी
Release dateJul 26, 2017
ISBN9789381659281
Vajan Ghatvaa वजन घटवा

Related to Vajan Ghatvaa वजन घटवा

Related ebooks

Reviews for Vajan Ghatvaa वजन घटवा

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Vajan Ghatvaa वजन घटवा - Vaidya Suyog Dandekar

    चार शब्द

    प्रिय वाचक मित्रांनो आणि बंधु भगिनींनो,

    आज वजन कमी करण्याची संजीवनी पाजणारी शंभर एक पुस्तकं बाजारात आहेत आणि तरीही पृथ्वीचं वजन काही कमी होताना दिसत नाही. आता असं असताना अजून एक पुस्तक लिहून मी काय साधणार असा प्रश्न तुम्हाला पडणं अगदीच स्वाभाविक आहे. पण जर हे पुस्तक नुसतं चाळायला लागलात तरी तुम्हाला त्यात पानापानावर अॅक्शन प्लॅन्स दिसतील.

    आता वजनाचा मुळात आयुर्वेदाशी संबंधच काय असा प्रश्नही काही सूज्ञ वाचकांना पडेल, त्यांच्यासाठी खुलासा करतो.

    आयुर्वेद ही काही एक फक्त वैद्यकीय शाखा नाही. आयु: वेद: अशी त्याची फोड आहे. वर्षानुवर्षे अंगिकारलेली ती एक ‘जीवनप्रणाली’ आहे. मुळात वजन घटवण्याच्या हजारो पद्धती अस्तित्वात असल्या तरी त्याचा अनेकदा आपल्याला उपयोग का होत नाही याचा वाचकांनी जरूर विचार करावा. उत्तर सोपं आहे. पहिलं कारण म्हणजे वजन घटवण्याच्या पद्धती आपण उपचारासारख्या वापरतो पण आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक न बनल्यामुळे ती उपचार पद्धत आणि आपण यातलं अंतर वाढतच जातं... आणि एक दिवशी पटकन संपूनही जातं... आणि मग पहिले पाढे पंचावन्न !

    दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आयुर्वेद ही ‘वैयक्तिक प्रकृती चिकित्सेवर’ आधारलेली गोष्ट आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाजारात विकत मिळणारे कपडे आणि आपल्या नेहमीच्या शिंप्याने शिवलेले कपडे यात कुठले कपडे आपल्याला शोभून दिसतात? तुम्हाला माहीतच आहे. जर कपड्यासारखी गोष्ट या प्रकारामध्ये आपल्याला चालत नाही, तर आपलं शरीर, जे आपल्या एकट्याचं शरीर आहे, त्याला बाजारातल्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करून सुडौल बनवणं हे केवळ हास्यास्पद आहे.

    शेजारच्या नानांनी डाएट मील वर वजन कमी केलं. जोशीकाकूंनी जीम लावली आणि पटापटा वजन कमी करायला सुरुवात केलीय... मानसीने... ह्या असल्या गप्पांनी आपण आपला वेळ मजेत घालवतो. विनोद म्हणजे त्यावरची पुस्तकं वाचतो आणि आपल्याला लगेच हलकं वाटायला सुरुवात होते ! (?)

    गंमतीचा भाग सोडून देऊन मूळ विषयाकडे वळतो. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या माध्यमातून मी अनेक लोकांना भेटतो तेव्हा लक्षात येतं की वजन कमी करण्यासाठी लोक उत्सुक असतात, कारण असंख्य प्रकारची दुखणी चिकटण्याची त्यांना भीती वाटते. मी त्यांना दोन गोष्टी सांगतो – एक म्हणजे आयुर्वेदाच्या नियमानुसार तुमची प्रकृती ओळखा आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला आहार, व्यायामाचा आराखडा देईन तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे जे काही ठरवू ते चिरकाल टिकणारं हवं. तुमच्या आयुष्याचा, जीवनशैलीचा भाग बनणारी गोष्टच स्वीकारा... नाहीतर परत तुम्ही काही दिवसांनी पश्चात्तापच करत बसाल.

    या अशा अनेक पद्धती या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केलाय. खरंतर आयुर्वेदिक चिकित्सा करूनच मग गोष्टी सांगाव्यात. पण सर्वदूर पसरलेल्या वाचकांच्या सोयीसाठी ह्या पुस्तकाची रचना अशी केलीय की तुमची साधारण प्रकृती तुम्ही ओळखू शकाल व ती जीवनशैली तुम्ही आत्मसात कराल.

    तुमच्या वजन घटवण्याच्या नवीन प्रोजेक्टला माझ्या शुभेच्छा. आमच्याकडे जरूर भेटायला या. तेव्हा बोलूच...

    आपला

    वैद्य सुयोग दांडेकर

    या पुस्तकात दिलेला केसपेपर भरून आमच्याकडे पाठवावा.

    हे पुस्तक असं वाचा...

    लठ्ठपणा हा आजार नसून ही शरीराची ठेवण आहे. हे पुस्तक लठ्ठ व्यक्तींपुरतंच मर्यादित नाही, ज्यांच्या घरात लठ्ठ माणसांची पार्श्वभूमी आहे, पण जे लोक बारीक आहेत, जे लोक आधुनिक जीवनशैलीमध्ये खूप अडकून गेले आहेत, खरंतर ज्याला उत्तम, आनंदी आयुष्य जगण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

    या पुस्तकाचा उत्तम फायदा मिळवण्यासाठी हे पुस्तक अशा पद्धतीने वाचा :

    जाडी कमी करण्यापूर्वी – केसपेपर

    हा केसपेपर भरा

    मी खरंच लठ्ठ आहे का ?

    हे प्रकरण वाचून त्यातील तपासण्या करून घ्या. त्यातील माहिती केसपेपरसोबत प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टकडे पाठवा.

    पुस्तक क्रमश: वाचा.

    तीन महिन्यांचा कृती कार्यक्रम वाचा आणि सुरूवात करा.

    सूचनांप्रमाणे तंतोतंत पालन करून दैनंदिनी लिहिण्याची सवय करा.

    तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.

    जाडी कमी करण्यापूर्वी – केसपेपर

    वैद्य सुयोग दांडेकर

    साई माऊली चिकित्सा मंदिर / प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, सातारा, राधिका रोड, राधिका टॉकीजजवळ, सातारा ४१५ ००२

    ०२१६२-२३०१३७ / ९८५०८४८४८२

    E-mail : drdandekaropd@gmail.com

    Website : www.prakrutiayur.com

    नाव

    पत्ता

    जन्मतारीख: / / वय - उंची - सें.मी.

    वजन - कि.ग्रॅ. लिंग – स्त्री पुरुष

    १) आई वडीलांपैकी कोणाचे वजन जास्त आहे ? –

    २) तुमचा व्यवसाय / नोकरी याविषयी माहिती लिहा –

    ३) तुमच्या आहाराविषयी – १) शाकाहारी २) मांसाहारी ३) मिश्राहारी

    नाष्टा –

    जेवणाच्या वेळा – दुपारी रात्री

    ४) रोजच्या आहारामध्ये असणाऱ्या विविध पदार्थांचे प्रमाण सांगा –

    उदा. १ भाकरी / १ चपाती १ वाटी भात १/२ वाटी भाजी १ वाटी आमटी

    या केसपेपरच्या झेरॉक्स वापरून घरातील सर्वांची माहिती पाठवू शकता. या माहितीप्रमाणे वैद्यकीय मार्गदर्शन मोफत आहे.

    आहार परीक्षण :

    सध्या घेतले जाणारे पदार्थ व त्याचे प्रमाण – (महिन्यातून किती वेळा उदा. महिन्यात १ वेळा – १ इ. प्रकारे व एकवेळचे प्रमाण चमचा, वाटी बशी, इ. प्रमाण) सीझनल पदार्थांचे सीझनलमधील प्रमाण लिहावे. नीट आठवून लिहा की हा पदार्थ महिन्याभरात किती खाल्ला.

    दोन जेवणाव्यतिरिक्त मधल्या वेळेत कितीदा खाल्ले जाते?

    सकाळी नाष्टा किंवा जेवणानंतर लगेच प्रवास होतो? हो नाही

    सकाळी उठण्याची वेळ रात्री झोपण्याची वेळ

    पोट साफ होते का? होय नाही किती वेळा जावे लागते

    संडासचे स्वरुप

    १) खडा २) सोललेल्या केळाप्रमाणे ३) चिकट ४) पातळ

    गॅसेस होतात? होय नाही

    संडास पाण्यात बुडतो संडास पाण्यावर तरंगतो

    लघवीची तक्रार १) कमी होणे २) जास्त होणे ३ ) जळजळ होणे

    ४) खर जाणे ५) वारंवार होणे

    कामाचे ठिकाण ए.सी. नॉन ए.सी.

    तुमच्या आवडीचे पदार्थ

    नियमितपणे व्यायाम करता? होय नाही

    होय असल्यास,

    १) किती वाजता करता?

    २) व्यायाम कशा प्रकारचा असतो?

    उदा. योगासने, जीम, बॅडमिंटन, चालणे, सायकलिंग

    3) व्यायामाचा कालावधी - मिनिटे

    शारीरिक सवयी

    इतर व्यसन

    १) चहा २) कॉफी ३) शीतपेये ४) सिगारेट ५) तंबाखू ६) दारू

    तुम्हाला घाम येतो का? हो नाही

    घामाला वास येतो ? हो नाही

    स्त्री पेशंटस् करिता –

    मासिक पाळीची सुरुवात वयाच्या कितव्या वर्षी झाली?

    किती दिवस स्राव जातो?

    स्रावाचे स्वरूप – लाल काळपट लालसर-काळपट गाठीयुक्त

    पाळीच्या वेळी इतर त्रास कंबरदुखी स्तनामध्ये गाठी/वेदना असणे

    बाळंतपणाविषयी –

    १) किती वेळा झाली?

    २) नॉर्मल सिझेरियन

    क्युरेटिन झाले आहे का? असल्यास किती वेळा? होय वेळा

    कॉपर टी घातली आहे का? होय नाही

    संततीनियमनाच्या गोळ्या घेतल्या आहेत? हो नाही

    बाळंतपणानंतर शेक,धूप, पोट बांधणे ह्या चाली आचरणात आणल्या होत्या?

    होय नाही

    इतर आजार व त्यावरील औषधोपचाराविषयी / ऑपरेशनबद्दल माहिती –

    आहारात पथ्ये पाळत असल्यास त्याबद्दल माहिती –

    रात्रीच्या जेवणाची वेळ pm

    जेवणासाठी लागणारा कालावधी मिनिटे

    जेवताना टी.व्ही. बघता? हो नाही

    जेवताना इतरांशी गप्पा मारता हो नाही

    जेवण करता-करता पिणारे पाणी १ ग्लास १ तांब्या

    जेवण झाले की लगेच किती पाणी पिता? १ ग्लास १ तांब्या ml

    पाळी गेली असल्यास वरील गोष्टी इतिहास म्हणून लिहाव्यात.पाळी जाताना काही त्रास झाला होता का?

    गर्भाशयाची पिशवी काढायचे ऑपरेशन झाले आहे का? हो नाही

    पेशंटनी खालील रकान्यांमध्ये आठवड्यातील कोणत्याही ३ दिवसांचा एकंदरीत दिनक्रम लिहावा.

    दिवस पहिला

    दिवस दुसरा

    दिवस तिसरा

    पेशंटनी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1